शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

ट्रॅक्टरला ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीवरील वृद्ध कोसळून आले वाहनाखाली

By विजय.सैतवाल | Updated: January 5, 2024 15:39 IST

उड्डाणपुलावर अपघातात वृद्ध ठार : दुचाकीने पिता-पूत्र जात होते पारोळ्याला

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना दुचाकीवर मागे बसलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक (७८, रा. पारोळा) हे अचानक खाली पडले व त्यांच्या अंगावरून वाहन गेल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा दुचाकीचालक अस्लम शेख युसूफ खाटीक (४४, रा. पारोळा) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, ५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावर झाला. 

पारोळा येथील रहिवासी असलेले युसूफ शेख ईस्माईल खाटीक व अस्लम शेख युसूफ खाटीक हे पिता-पूत्र जळगावला आलेले होते. शुक्रवारी दुपारी ते दुचाकीने (क्र. एमएच १९, ईएफ ७५२४) पारोळा येथे परत जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरून ते जात असताना अस्लम शेख हे समोर जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होते. त्या वेळी मागे बसलेले त्यांचे वडील युसूफ शेख यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. 

अपघातानंतर नागरिकांनी धाव घेऊन मृतदेह कापडाखाली झाकला व अपघातग्रस्त वाहन बाजूला करीत वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. या वेळी वडिलांचा मृतदेह पाहून अस्लम शेख हे नि:शब्द झाले होते. काही वाहनधारकांनी त्यांना धीर दिला. घटनास्थळी तालुका पोलिस पोहचले व त्यांनी मृतदेह व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले.

टॅग्स :Accidentअपघात