नंदुरबारातील वाण्याविहिर येथे म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत पडून पशुधन अधिकाºयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 18:53 IST2017-11-23T18:42:59+5:302017-11-23T18:53:13+5:30
म्हशीला टॅग लावत असताना घडली घटना

नंदुरबारातील वाण्याविहिर येथे म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत पडून पशुधन अधिकाºयाचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.२३ : वाण्याविहिर येथे टॅग लावत असताना म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत जाऊन पडल्याने सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग वनसिंग पाडवी (५७) यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला़
पशुसंवर्धन विभागाकडून सध्या पाळीव गुरांचे टॅगिंग करण्यात येत आहे़ गुरांच्या कानाला युआयडी क्रमांक असलेला बिल्ला लावून टॅगिंग केली जात आहे़ यासाठी मंगळवारी सायंकाळी वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग पाडवी हे धीरज क्षत्रिय यांच्याकडे गेले होते़ त्यांच्या म्हशींना टॅग लावण्याचे काम सुरू असतानाच एका म्हशीने त्यांना लाथ मारली. त्यामुळे ते तोल जाऊन जवळच असलेल्या विहिरीत पडले़ विहिराच्या कठड्यांचा मार बसल्याने ते जखमी झाले़
क्षत्रिय व परिसरातील नागरिकांनी त्यांना विहिरीबाहेर काढत, अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले़ पाडवी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्री नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ याठिकाणी उपचार सुरू असताना १० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत शैलेंद्र चंद्रसिंग पाडवी यांनी दिलेल्या खबरीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे़