फैजपूर येथे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:14 IST2018-12-15T23:12:25+5:302018-12-15T23:14:54+5:30
पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने १४ रोजी फैजपूर शहरात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यावरून चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या शेख आरिफ शेख करीम रा.फैजपूर या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

फैजपूर येथे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने १४ रोजी फैजपूर शहरात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यावरून चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या शेख आरिफ शेख करीम रा.फैजपूर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.
भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे यांच्यासह पदाधिकाºयांनी पोलीस ठाणे गाठत डीवायएसपी राजेंद्रसिंग व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची भेट घेतली. भावना दुखावल्याप्रकरणी डॉ.कोल्हे यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय निकम करीत आहे.
असभ्य वक्तव्य
शेख आरीफ शेख करीम याने व्हिडिओ चित्रीकरण करून ते व्हायरल केले त्यात अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत असभ्य वक्तव्य आहे, संबंधितावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदन अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, खंडोबा देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, शिवमदास योगी महाराज, सुरेश शास्त्री मानेकर बाबा यांनी दिले आहे.