भालोद कॉलेजचे आमोदा येथे रासेयो शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:59 IST2019-01-01T14:58:17+5:302019-01-01T14:59:33+5:30

भालोद, ता. यावल : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी शिबिराचे ...

Nursery Camp at Amoda, Bhalod College | भालोद कॉलेजचे आमोदा येथे रासेयो शिबिर

भालोद कॉलेजचे आमोदा येथे रासेयो शिबिर

ठळक मुद्देशिबिरात उपक्रमांताबाबत देण्यात आली माहितीमान्यवरांनी स्वच्छता व स्वयंशिस्तीचा दिला मंत्र

भालोद, ता.यावल : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन आमोदा येथे घ.का.विद्यालय परिसरात घेण्यात आले. जि.प. उर्दू शाळेचा विद्यार्थी मो.उजेर शेख अरीफ याच्या हस्ते झाले. संस्थाध्यक्ष आमदार हरिभाऊ जावळे अध्यक्षस्थानी होते.
शिबिरात विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली. प्राचार्य डॉ.ए.एस. कोल्हे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी चेअरमन दिलीप हरी चौधरी, कार्यकारी सदस्य इच्छाराम लीलाधर चौधरी, घ.का. विद्यालय संस्थेचे अध्यक्ष उमेश प्रभाकर पाटील, चेअरमन विवेक दत्तात्रय लोखंडे, ज्येष्ठ नागरिक उखर्डू हरी पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांनी स्वच्छतेचा मंत्र देवून स्वयंशिस्तीबाबत मार्गदर्शन केले.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक योगेश बडगुजर यांनी केले. कार्यक्रम अधिकारी डॉ.आशुतोष वर्डीकर यांनी प्रास्ताविक केले. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.वर्षा नेहेते यांनी आभार मानले.

Web Title: Nursery Camp at Amoda, Bhalod College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.