रुग्णसंख्या साडे तीन हजार पार, २४ वर्षीय तरुणाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:10 PM2020-08-10T12:10:16+5:302020-08-10T12:10:35+5:30

७७ नव्या रुग्णांची नोंद : ग्रामीण भागातही वाढला संसर्ग

The number of patients has crossed three and a half thousand and a 24-year-old youth has also died | रुग्णसंख्या साडे तीन हजार पार, २४ वर्षीय तरुणाचाही मृत्यू

रुग्णसंख्या साडे तीन हजार पार, २४ वर्षीय तरुणाचाही मृत्यू

Next

जळगाव : शहरात ७७ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला़ रुग्णसंख्या ३५४३ असून यापैकी ८७० रुग्ण उपचार घेत आहेत़ दोन बाधितांच्या मृत्यूची रविवारी नोंद करण्यात आली. +यात २४ वर्षीय तरूणाचा समावेश आहे.
गेल्या पाच दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यूचे प्रमाण घटले असून पाच दिवसात दहा मृत्यूची नोंद झाली आहे़ आधी एका दिवसाला दहा मृत्यूची नोंद होत असल्याचे चित्र होते़
रविवारी या ठिकाणी दोन बाधितांचे मृत्यू झाले तर जिल्हा भरात सात बाधितांचा मृत्यू झाला़ यात जळगाव शहरातील २, चोपडा, जामनेर, अमळनेर, मुक्ताईनगर, पाचोरा या ठिकाणच्या प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे़
अधिष्ठाता कार्यालयात बाधितांची संख्या पाच
अधिष्ठाता कार्यालयातील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ गेल्या तीन दिवसात पाच लोकांना बाधा असल्याचे समोर आले आहेत़
आधी बाधित आढळलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पाच ते सात जणांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात एक कर्मचारी बाधित आढळून आला आहे़

पिंप्राळयात पुन्हा ८ जण
पिंप्राळा भागात कोरोना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र असून रविवारी पुन्हा या भागात ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे़ यासह बालाजी पेठ ८, महाबळ ८, खोटेनगर ५, पोलीस लाईन ३, गायत्रीनगर, गुजराल पेट्रोलपंप, दादावाडी, आशाबाबा नगर, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, मुकताईनगर, मोहन नगर या भागात प्रत्येकी २ तर कोंबडी बाजार, बी़ जे़ मार्केट, आदर्शननगर, जुने जळगाव, आहुजानगर, आनंदमंगल कॉलनी, वाघनगर, माऊलीनगर, रामेश्वर कॉलनी, नवीपेठ भोईटे नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे़

आव्हाणे येथे चाचणीत ४१ जण पॉझिटीव्ह
ग्रामीण भागातही रोज रुग्ण समोर येत आहेत़ जळगाव तालुक्यातील एकत्रित रुग्णसंख्या ७०६ झालेली आहे़ यात आव्हाणे येथे घेण्यात आलेल्या रॅपीड अ‍ॅन्टीजन तपासणीत दोन दिवसात ४१ रुग्ण समोर आल्याची माहिती आहे़ मृत्यूची संख्या ४४ झाली असून ४२६ रुग्ण बरेही झालेले आहेत़

मनपा पदाधिकाºयांचे नातेवाईक निगेटीव्ह
पिंप्राळा येथील रहिवासी महिला व महापलिकेच्या पदाधिकारी यांचे सर्व नातेवाईकांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले़ त्या शनिवारी त पासणीनंतर बाधीत आढळून आल्या होत्या़ रविवारी त्यांच्या संपर्कातील सर्व नातेवाईकांची तपासणी करण्यात आली़

Web Title: The number of patients has crossed three and a half thousand and a 24-year-old youth has also died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.