जळगाव - सामाजिक कार्यकर्ते नीलेश तायडे यांनी देशसेवेच्या उद्देशाने प्रेरित होवून शनिवारी शहरातील १०० प्रेक्षकांना मोफत परमाणू सिनेमा दाखवला आहे. शहरातील मेट्रो सिनेमागृहात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला जळगावकरांनी भरभरून दाद दिली. दरम्यान, बालसुधारगृहातील चिमुकल्यांनी देखील चित्रपटाचा आनंद लुटला.देशात घेण्यात आलेल्या पहिल्या परमाणू चाचणीची इत्यंभूत माहिती असलेला परमाणू चित्रपट नुकताच चित्रपटगृहात आला आहे. चाचणी करताना आलेल्या अडचणी, सभोवताली असलेली परिस्थिती, पाळण्यात आलेली गोपनीयता, चाचणीनंतर देशाचे वाढलेले प्राबल्य या सर्व बाबी आजच्या तरुणाईला माहिती असणे आवश्यक आहे. देशाची एक विशेष मोहिम सर्वांना कळावी यासाठी नीलेश तायडे यांनी पुढाकार घेतला. उपक्रमासाठी चेतन वाणी, वसीम खान, राकेश वाणी, पंकज सोनवणे, शेखर सपकाळे, प्रवीण इंगळे, अजय सोनवणे, सनी भालेराव, मयुर विसावे आदींसह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्यजिल्हा बालसुधारगृह आणि बाल निरीक्षण गृहातील ३० मुलामुलींना परमाणू चित्रपट दाखविण्यात आला. शाळेच्या सुट्ट्यांमुळे कंटाळा आलेल्या चिमुकल्यांच्या चेहºयावर चित्रपट पाहून आनंद दिसून आला. बालसुधारगृहाच्या अधीक्षिका जयश्री पाटील, जयश्री भिंगारे, सरला जैन आदींनी विशेष सहकार्य केले.
देशसेवा कळावी यासाठी जळगावात १०० प्रेक्षकांना दाखविला ‘परमाणू सिनेमा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 18:48 IST
सामाजिक कार्यकर्ते नीलेश तायडे यांनी देशसेवेच्या उद्देशाने प्रेरित होवून शनिवारी शहरातील १०० प्रेक्षकांना मोफत परमाणू सिनेमा दाखवला आहे. शहरातील मेट्रो सिनेमागृहात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला जळगावकरांनी भरभरून दाद दिली.
देशसेवा कळावी यासाठी जळगावात १०० प्रेक्षकांना दाखविला ‘परमाणू सिनेमा’
ठळक मुद्देनीलेश तायडे या तरुणाचा उपक्रमदेशसेवा कळण्याच्या उद्देशातून उपक्रमबालसुधारगृहातील चिमुकल्यांनी लुटला आनंदजळगावकरांनी दिली उपक्रमाला दाद