माझी मुलगी म्हणून नाही, भाजपच्या उमेदवार म्हणून रोहिणी खडसे यांना विजयी करा - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:47 PM2019-10-04T12:47:33+5:302019-10-04T12:47:49+5:30

मुक्ताईनगरातून रोहिनी खडसे या भाजप उमेदवार

Not as my daughter, win Rohini Khadse as BJP candidate | माझी मुलगी म्हणून नाही, भाजपच्या उमेदवार म्हणून रोहिणी खडसे यांना विजयी करा - एकनाथराव खडसे

माझी मुलगी म्हणून नाही, भाजपच्या उमेदवार म्हणून रोहिणी खडसे यांना विजयी करा - एकनाथराव खडसे

googlenewsNext

मुक्ताईनगर, जि. जळगाव : भाजपच्या चौथ्या उमेदवारी यादीतही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न येता अखेर त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी समर्थकांशी चर्चा करताना एकनाथराव खडसे यांनी माझी मुलगी म्हणून नाही तर भाजपच्या उमेदवार म्हणून अ‍ॅड. रोहिणी खडसे यांना विजयी करा, असे आवाहन केले.
या वेळी त्यांनी गेल्या चाळीस वर्षात पक्षाने जो आदेश दिला त्याचे आपण पान केले आहे. आताही पक्षाने जो निर्णय घेतला आहे, त्या प्रमाणे आपण काम करू असेही खडसे यांनी नमूद केले. त्या नंतर खासदार रक्षा खडसे, रोहणी खडसे, एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे व पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदावारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले.
रोहिणी खडसे या सध्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा असून त्या सोबतच भाजपच्या जिल्हा सरचिटणीही आहेत.

Web Title: Not as my daughter, win Rohini Khadse as BJP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.