कुपोषणाचे नव्हे, अक्षम्य दुर्लक्षाचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:40+5:302021-08-13T04:20:40+5:30
आसराबारी हा पाडा काही दिवसांपूर्वी शासकीय कागदावरपण अस्तित्वात नव्हता. या ठिकाणचे ५०० पेक्षा अधिक रहिवाशांकडे आधारकार्ड नाही, रेशन कार्ड ...

कुपोषणाचे नव्हे, अक्षम्य दुर्लक्षाचे बळी
आसराबारी हा पाडा काही दिवसांपूर्वी शासकीय कागदावरपण अस्तित्वात नव्हता. या ठिकाणचे ५०० पेक्षा अधिक रहिवाशांकडे आधारकार्ड नाही, रेशन कार्ड नाही, कुठलीही यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. जनजागृतीचा प्रकार नाही, या भागात एका निरागस आठ महिन्यांच्या बाळाचा कुपोषणाने मृत्यू झाला. माध्यमांनी हा विषय समोर आणला नसता तर कदाचित या मृत्यूची साधी नोंद करून यंत्रणा पुन्हा झोपी गेली असती. या भागात अंगणवाडी, मिनी अंगणवाडी अस्तित्वात नसल्याने या बाळाची कुठेच काही नोंद नव्हती. या भागासह अशा विविध २७ मिनी अंगणवाड्यांचे प्रस्ताव स्थानिक पातळीवरून पाठवून ते शासनदरबारी धूळ खात पडून आहेत. कदाचित अंगणवाडी असती तर त्या बाळाची किमान नोंद होऊन पुढील धोका टाळता आला असता. या पाड्यावर आताही अनेक बालके आहेत. किमान त्यांच्यावर तरी लक्ष ठेवून पुढील धोके टाळावे, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. मात्र, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी याबाबत कुठलाही आढावा घेतला नाही, गावात भेटही न दिल्याची माहिती आहे. या भागातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य करताहेत काय? लोकप्रतिनिधींना या मुद्द्यावर भाष्य करावे, कुठे पाठपुरावा करावा असा साधा विचारही येत नसेल तर.. त्यांच्या विकासाची व्याख्या..त्यांनीच केलेली बरी...