Nobel Science Talent Search Exam | नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात

जळगाव : नोबेल फाउंडेशन आणि भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी सकाळी ११ ते १ यावेळेत उत्साहात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ५ हजार ३२० विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले. राज्यभरात ४० ठिकाणी परीक्षा केंद्रे्र देण्यात आली होती.
ग्रामीण विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या उच्च संस्था भेटीसाठी अशा प्रकारचीे स्पर्धा परीक्षा नोबेल फाउंडेशनतर्फे घेतली जाते. या परीक्षेसाठी पाचवी ते सातवी असा एक गट आणि आठवी ते दहावी असा दुसरा गट आहे. या दोन्ही गटातून गुणवत्ता यादीत असणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. त्यातून ५० विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयएम आणि आयआयटी येथे नि:शुल्क अभ्यास सहलीसाठी नेण्यात येणार आहे. तसेच गुणवत्ता यादीत येणाºया प्रथम विद्यार्थ्याला संगणक, द्वितीय विद्यार्थ्याला टॅबलेट तर तृतीय विद्यार्थ्याला मोबाईल बक्षिस मिळणार आहे. ग्रामीण विद्यार्थी हुशार असतो, त्याला संधी आणि मार्गदर्शन मिळत नाही म्हणून ते मागे पडतात. नोबेल फाउंडेशन व भरारी फाउंडेशन च्या माध्यमातून या मुलांना इस्रो, आयआयटी, आयआयएम सारख्या शिक्षण व संशोधन संस्था दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी प्रतिक्रिया नोबेल फाउंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील यांनी दिली.

Web Title:  Nobel Science Talent Search Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.