शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

शारदीय नवरात्रोत्सवात महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:14 AM

नावीन्य बहुउद्देशीय फाऊंडेशन, जळगाव आणि खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आंतरविद्याशाखीय महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे घटस्थापनेला स्मिता वाघांनी गुंफले पाहिले पुष्पअनेकांचा प्रतिसाद

अमळनेर : नावीन्य बहुउद्देशीय फाऊंडेशन, जळगाव आणि खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आंतरविद्याशाखीय महिलांच्या सन्मानार्थ नऊ दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.१७ आॅक्टोबर घटस्थापना ते २५ आॅक्टोबर विजया दशमी दरम्यान दररोज सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हा आॅनलाइन वेबिनार पार पडणार आहे. पहिल्या दिवशी घटस्थापनेला माजी आमदार स्मिता वाघ यांनी पहिले पुष्प गुंफून या वेबिनारचा शुभारंभ केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील होत्या. स्मिता वाघ यांनी महिलांचे राजकीय क्षेत्रात संघटन कौशल्य व योगदान या विषयावर विचार प्रकट केले. अनेकांनी आॅनलाइन भेट देऊन मोठा प्रतिसाद या वेबिनार ला दिला.प्रास्तविक प्रताप महाविद्यालयाचे प्रा.डॉ.धनंजय चौधरी यांनी केले. १८ रोजी मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांचे "मी आणि सध्याची परिस्थिती" या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील होत्या.१९ रोजी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक भारती पाटील यांचे महिलांच्या सामाजिक कार्यात अडचणी व समाधान या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा इंदिराताई पाटील असतील. २० रोजी जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड.ललिता श्याम पाटील यांचे महिलांचे न्याय पालिकेतील योगदान या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी जायन्स फेडरेशन २ ए चे व्हा.प्रेसिडेंट,महाराष्ट्र संगीता हिरालाल पाटील राहतील. २१ रोजी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांचे महिलांचे प्रशासकीय सेवेतील योगदान या विषयावर व्याख्यान होईल अध्यक्षस्थानी जि.प.सद्स्य जयश्री अनिल पाटील असतील.२२ रोजी ओरुगा वर्ड पुणे च्या संस्थापक निलाक्षी मुंदडा डालिया यांचे महिलांची उद्योग जगातील भरारी, अडचणी व समाधान या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी उच्च न्यायालय मुंबईच्या डॉ.कामिनी जयश्री सुहास या राहतील. २३ रोजी पुणे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय पुणे च्या प्राचार्य डॉ.नलिनी पाटील यांचे आनंदात कसे जगावे या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.ज्योती राणे असतील. २४ रोजी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूरच्या प्रा.डॉ.जयश्री हेमंत म्हैसकर यांचे महिलांचे आरोग्य व आयुवेर्दाचे योगदान या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी अध्यक्षस्थानी अमळनेरच्यासामाजिक कार्यकर्त्या डॉ.अपर्णा मुठे असतील. विजयादशमीला २५ रोजी समारोपीय व्याख्यान रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रा यांचे महिला आणि स्वरोजगार या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे असतील. 

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर