शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

नव्या धोरणात मिळणार योग्यता प्राप्त करण्यासाठीचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 21:19 IST

जळगाव : केंद्र सरकारकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात व्यापक विचार करण्यात आला असून केवळ गुण अथवा ...

जळगाव : केंद्र सरकारकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात व्यापक विचार करण्यात आला असून केवळ गुण अथवा पदवी प्राप्त करण्याऐवजी योग्यता प्राप्त करण्यासाठीचे शिक्षण दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पात्रतेच्या विकासाला संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन गुजरातच्या वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.शिरीष कुलकर्णी यांनी केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्दितीय नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी आॅनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही.पवार आदींची उपस्थिती होती.विद्यार्थ्याच्या विश्लेषणात्मकतेला वाव मिळणारउच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर बोलतांना प्रा.कुलकर्णी म्हणाले की, ३४ वषार्नंतर नवे शौक्षणिक धोरण जाहिर झाले आहे. हे राबवतांना आव्हाने खूप असले तरी संधी भरपूर आहेत. विद्यार्थी कच्चा राहू नये यासाठी पूर्वप्राथमिक शिक्षणापासून धोरणात विचार करण्यात आला आहे. स्थानिक मातृभाषेला महत्त्व देण्यात आले आहे. आताच्या धोरणात विद्यार्थी केवळ परीक्षार्थी आहे. नव्या धोरणात गुण अथवा पदवी मिळवण्यासाठी शिक्षण दिले जाणार नसून योग्यता प्राप्त करण्यासाठी दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयाची आवड आहे ते त्याला शिकता येईल. विद्यार्थ्याच्या विश्लेषणात्मकतेला वाव मिळणार आहे. या धोरणामुळे विद्यापीठांची तीन प्रकारात वर्गवारी होणार असून एक प्रकार बहुउददेशीय विद्याशाखीय संशोधन शिक्षणाचे विद्यापीठ, दुसरा प्रकार केवळ संशोधनाचे विद्यापीठ आणि तिसरा अध्ययन व अध्यापनाचे विद्यापीठ असे तीन प्रकार राहतील. येत्या पंधरा वर्षात विद्यापीठाशी महाविद्यालये संलग्न करण्याची प्रथा बंद होऊन ही महाविद्यालये स्वायत्त (स्वनिर्भर) करण्यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.भविष्यातील योजनांचा घेतला आढावाकवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला दिले गेल्याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगून हा नामविस्तार इथल्या खेड्यापाड्यातील युवक युवतींशी अतूटपणे जोडला गेला आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांनी व्यक्त केले़ तसेच बहिणाबार्इंच्या कर्तबगारीची विचारधारा घेऊन विद्यापीठाची वाटचाल सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाच्या रचनात्मक कामांचा तसेच भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव