निपाण्यात गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:56 IST2020-04-05T20:55:06+5:302020-04-05T20:56:15+5:30

गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी झाली.

Nestled in the grasshopper base at 'Swamp' | निपाण्यात गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी

निपाण्यात गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी

ठळक मुद्देतक्रारदार पुढे आला नाहीसंबंधितास समज देऊन सोडले

निपाणे, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधितांना ताब्यात घेऊन नंतर समज देऊन सोडून देण्यात आले. ४ रोजी सायंकाळी हा प्रकार घडला.
लॉकडाऊन काळात मद्याची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात पोलीस विभाग गावठी दारूचे उद्ध्वस्त करीत आहे. असे असतानाही निपाणे येथे गावठी दारूची खुलेआम विक्री होत आहे. ४ रोजी गावठी दारू अड्ड्यावर तळीरामांमध्ये हाणामारी झाली. याची खबर पोलिसांना लागली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत कोणीही तक्रार दिली नाही.
हाणामारी करणाऱ्याला ५ रोजी सकाळी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. पोलिसांनी संबंधितास समज देऊन सोडून दिले.
दरम्यान, जवखेडेसीम येथे मद्य विक्री बंद आहे. त्यामुळे तेथील तळीराम दारू पिण्यासाठी निपाणे येथे दररोज ये-जा करतात. एवढी गर्दी असते की जशी काय यात्राच भरलेली दिसते. त्याच बाजुला मांस विक्रेत्याचे दुकान आहे. परिणामी भरपूर गर्दी राहते. अशा परिस्थितीत दारू बंद करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Nestled in the grasshopper base at 'Swamp'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.