वाघूर धरणसाठा नव्वदीजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:10 AM2020-08-03T00:10:27+5:302020-08-03T00:10:27+5:30

सात दिवसात सहा टक्क्यांनी वाढ

Near Waghur dam stock ninety | वाघूर धरणसाठा नव्वदीजवळ

वाघूर धरणसाठा नव्वदीजवळ

Next

जळगाव : जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १७.५६ टीएमसी  उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या सात दिवसात वाघूर धरणाच्या साठ्यात ६.०७ टक्कांनी वाढ झाली आहे. तर अंभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, तोंडापूर व हिवरा हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
जळगावात पाऊस गायब असताना ‘वाघूर’मध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारली आहे. यामुळे बळीराजाची चिंता वाढत आहे. सोबतच उकाडाही कायम असल्याने सर्वांना नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जळगावात पाऊस गायब असला तरी जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया वाघूर धरणसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगामध्ये दररोज मुसळधार पाऊस होत असल्याने वाघूर नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीला सलग पूर सुरू असून जळगावनजीकच्या वाघूर धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळेच गेल्या सात दिवसांमध्ये ध्नरणाच्या साठ्यात ६.०७ टक्क्यांनी वाढ होऊन धरण साठा ८९ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे जळगाव व जामनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे १३ मध्यम प्रकल्प आहे. तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५२.९९  टीएमसी आहे.
तीनही धरणांच्या साठ्यात वाढ
सलग पाऊस सुरू असल्याने वाघूर, गिरणा, हतनूर  धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. यात वाघूर धरण साठ्यात तर २५ दिवसात १६.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  ६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ८२.७५ टक्के झाला. यात वाढ सुरूच राहून तो आता ८९ टक्क्यांवर पोहचला आहे. अशाच प्रकारे गिरणा धरणात ६ जुलै रोजी ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ४२.४९ टक्क्यांवर पोहचला व आता हा साठा ४५.६३ टक्के झाला आहे. हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे दररोज उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या १४.७५ टक्के साठा आहे.  
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१०  दलघमी म्हणजेच ३६.२६  टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये ४९७.२४  दलघमी म्हणजेच १७.५६  टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.३३ टीएमसी, गिरणा ८.४४ टीएमसी तर वाघूर धरणात ७.७९ टीएमसी  उपयुक्त साठा आहे.  
तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२०  टीएमसी  आहे. तर जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पात  ४६.२९  दलघमी म्हणजेच ६.९३  टीएमसी  उपयुक्तसाठा आहे.

Web Title: Near Waghur dam stock ninety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.