पारोळा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:53 IST2018-09-14T21:50:22+5:302018-09-14T21:53:40+5:30

पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेळावे गणाच्या सदस्या छाया राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली .

NCP's Shadow Patil is elected unopposed as Chairman of Parola Panchayat Samiti | पारोळा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया पाटील बिनविरोध

पारोळा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया पाटील बिनविरोध

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या सुनंदा पाटील यांच्यावर आणला होता अविश्वासरिक्त पदासाठी झाली शुक्रवारी निवडएकही अर्ज न आल्याने छाया पाटील यांची बिनविरोध निवड

पारोळा : पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेळावे गणाच्या सदस्या छाया राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा पांडुरंग पाटील यांच्या वर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी संयुक्त अविश्वास पारित करण्यात आला होता. रिक्त पदावर शुक्रवार १४ रोजी सभापतीपदा साठी निवडणूक घेण्यात आली. वेळेच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया राजेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्या नंतर तीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी छायाबाई पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली .
सहलीवर गेलेले सदस्य दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात पोहचले. यात उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, अशोक नगराज पाटील, प्रमोद जाधव, रेखा भिल, छाया जितेंद्र पाटील उपस्थित झाले.

Web Title: NCP's Shadow Patil is elected unopposed as Chairman of Parola Panchayat Samiti