पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:23+5:302021-07-31T04:17:23+5:30

पारोळा : कोकण व कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला. नैसर्गिक संकटात सापडलेल्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ...

NCP provides essential items for flood victims | पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत

पारोळा : कोकण व कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला. नैसर्गिक संकटात सापडलेल्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी खारीचा वाटा उचलून शुक्रवारी जीवनावश्यक वस्तूंची गाडी भरुन पाठवत असल्याचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.

यावेळी जि. प. सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, माजी सभापती मनोराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शांताराम पाटील, पं. स.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील, तालुकाध्यक्ष बाळू पाटील, मेहमूद पठाण, करंजी सरपंच रोकडे, हिरापूर सरपंच वाल्मीक पाटील, चोरवड सरपंच राकेश पाटील, वसंतनगर माजी सरपंच अविनाश जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कपिल चौधरी, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भागवत, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, लोकेश पवार, वना महाजन, मन्साराम चौधरी, नाना पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी या संकट काळात पारोळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने खारीचा वाटा उचलून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे, असेही माजी मंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी जीवनावश्यक वस्तू असलेल्या मदतीच्या गाडीस पक्षाचा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली.

Web Title: NCP provides essential items for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.