अमळनेर येथे अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, सुप्रिया सुळेंवरील टीकेचा निषेध करत जाळला प्रतिकात्मक पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 20:25 IST2022-11-07T20:24:43+5:302022-11-07T20:25:15+5:30

यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

NCP protest against Abdul Sattar in Amalner symbolic effigy burnt | अमळनेर येथे अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, सुप्रिया सुळेंवरील टीकेचा निषेध करत जाळला प्रतिकात्मक पुतळा

अमळनेर येथे अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, सुप्रिया सुळेंवरील टीकेचा निषेध करत जाळला प्रतिकात्मक पुतळा

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. यावेळी सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेचा निषेध करत, राष्ट्रवादीच्या कार्यकरत्यांनी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. आमदार आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तासांच्या आत सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. एढेच नाही, तर सत्तारांनी सुप्रिया सुळे यांची जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान, या आंदोलनाच्या सुरुवातीला अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याजवळ दिवे लावण्यात आले होते. सत्तार यांच्या डोक्यात प्रकाश पडावा, त्यांना महिलांविषयी बोलण्याची सद्बुद्धी यावी. यासाठी हे दिवे लावल्याचे आमदार अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: NCP protest against Abdul Sattar in Amalner symbolic effigy burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.