एकनाथ खडसे अन् कन्या रोहिणी खडसेंनी विजयी मिरवणुकीत धरला ठेका, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 14:50 IST2023-04-30T14:49:10+5:302023-04-30T14:50:01+5:30
गेल्या २५ वर्षांची बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सत्ता एकनाथ खडसे यांनी अबाधित राखलेली आहे.

एकनाथ खडसे अन् कन्या रोहिणी खडसेंनी विजयी मिरवणुकीत धरला ठेका, पाहा Video
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८पैकी १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारएकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विजय मिळवला आहे. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकनाथ खडसे यांनी एक हाती सत्ता काबीज केली आहे.
गेल्या २५ वर्षांची बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सत्ता एकनाथ खडसे यांनी अबाधित राखलेली आहे. एकनाथ खडसे आणि खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे. खडसेंच्या कार्यकर्त्यांची यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
एकनाथ खडसे अन् कन्या रोहिणी खडसेंनी विजयी मिरवणुकीत धरला ठेका, पाहा Video pic.twitter.com/PMrlMk2ESQ
— Lokmat (@lokmat) April 30, 2023