शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू', अवघ्या १० कार्यकर्त्यांमधलंही राष्ट्रवादीचं आंदोलन फसलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:42 IST

महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांची जुहू आणि देहू यात मात्र गफलत झाल्याचं पाहायला मिळालं.

प्रशांत भदाणेपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळावर गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर मोदींनी हात ठेवला. त्यानंतर दोघेही देहू येथील कार्यक्रमासाठी गेले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले; मात्र प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांना संधी अपेक्षित असताना त्यांना वंचित ठेवले. त्यांचे नाव दिल्लीतूनच कट झाल्याची चर्चा होती. त्यामुळे, राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले असून हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावना राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करत आंदोलनही करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जळगावातील आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.

अजित पवारांचं देहू येथील कार्यक्रमात भाषण झालं नाही. याचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावात राष्ट्रवादीच्या महानगर महिला आघाडीनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांच्या हातातील बॅनरवर देहू ऐवजी जुहू (मुंबई) असा उल्लेख करण्यात आला. असं असलं तरी हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली तेव्हा ही चूक बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिसाच्या लक्षात आली.

यानंतरच कुठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भानावर आले. त्यांनी बॅनर गुंडाळून ठेवला आणि नुसती घोषणाबाजी करून आंदोलनाचा सोपस्कार पार पाडला. देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही म्हणून महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांना, देहू आणि जुहूतला फरक कळू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय.

अवघे दहाच कार्यकर्तेअवघ्या दहा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झालं. त्यातही आठ महिला आणि दोन पुरुष कार्यकर्ते होते. चुकीच्या बॅनरमुळे नाचक्की झाल्याने त्यांनी आंदोलन अवघ्या काही मिनिटांतच उरकलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात बॅनरवर चूक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही एका आंदोलनात बॅनरवर चूक झाली होती.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJalgaonजळगाव