शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भुसावळ येथे नाहाटा कॉलेजला जीवशास्त्रावर राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 21:37 IST

भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘जीवशास्त्रातील नवीन विचार प्रवाह’ या विषयावर सोमवारी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली.

ठळक मुद्दे परिषदेत ११५ संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक चार सत्रात झाली परिषद

भुसावळ, जि.जळगाव : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘जीवशास्त्रातील नवीन विचार प्रवाह’ या विषयावर सोमवारी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेत ११५ संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, कोषाध्यक्ष जयकुमार नाहाटा यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सचिव विष्णू चौधरी होते. प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, विद्यापीठ प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ प्रमुख डॉ.पी.एस.लोहार, विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ सदस्य डॉ.एस.ए.पाटील, परिषदेचे संयोजक उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.ब-हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, डॉ.संध्या सोनवणे, डॉ.शिरीष झांबरे, डॉ.एस.आर.महाजन,डॉ.एम.जी.पाटील, सहसंयोजक डॉ.डी.के. हिवराळे, संघटन सचिव डॉ.विद्या पाटील, संघटन सचिव डॉ.एम.जे.जाधव यांची उपस्थिती लाभली.चार सत्रात परिषदप्रथम सत्रात प्रा.डॉ.पी.एस.लोहार यांनी संगणकाचे वर्गीकरण शास्त्रातील योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात डॉ.एस.ए.पाटील यांनी बायोपायरसी : मोनोपोलीझिंग नॅचरल रिसोर्सेस यांनी या विषयावर पॉवरपॉइन्टच्या साहाय्याने मार्गदर्शन केले.तृतीय सत्रात संशोधक शोधनिबंधांचे वाचन तसेच पोस्टर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम- ज्योती अशोक पांडे, द्वितीय-सुभद्रा एम.चावराई तर तृतीय क्रमांक राजश्री नरेंद्र पाटील यांनी पटकावला. शोधनिबंध वाचनात प्रथम क्रमांक आनंद एस.जाधव, द्वितीय क्रमांक महेंद्रकुमार रमेश शिरसाठ यांनी पटकावले. चौथ्या सत्रात परिषदेचा समारोप झाला. उपप्राचार्य व परिषदेचे संयोजक डॉ.एस.व्ही.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.एन.पाटील, डॉ.शिरीष झांबरे, डॉ.एस.आर.महाजन, डॉ.एम.जी.पाटिल उपस्थित होते. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एम.जे.जाधव यांनी करून आभार मानले.संयोजक उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, सहसंयोजक डॉ.डी.के.हिवराळे, संघटन सचिव डॉ.विद्या पाटील, संघटन सचिव डॉ.एम.जे.जाधव, प्रा.ज्योती जंगले, प्रा.डी.एन.बोरीकर, प्रा.मोहिनी पाटील, प्रा.तुषार चौधरी, प्रा.देवेंद्र पाटील, प्रा.उमेश पाटील, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.शंकर पाटील तसेच विभागातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयBhusawalभुसावळ