चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमा अनावरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:43 PM2020-01-31T18:43:22+5:302020-01-31T19:00:11+5:30

श्री सदस्यांचे अथक प्रयत्न व ग्राम पंचायत खेडगाव पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून ग्राम पंचायत कार्यालयात पद्मश्री व सद्गुरू बैठकीचे प्रणेते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण उत्साही वातावरणात पार पडले.

Nanaasaheb fanatic image unveiling ceremony at Khedgaon in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमा अनावरण सोहळा

चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमा अनावरण सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देमनाबरोबरच झाली गावाची स्वछताभावनिक व उत्साही वातावरणात खेडेगावात पार पडला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमा अनावरण सोहळा

खेडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : श्री सदस्यांचे अथक प्रयत्न व ग्राम पंचायत खेडगाव पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून ग्राम पंचायत कार्यालयात पद्मश्री व सद्गुरू बैठकीचे प्रणेते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण उत्साही वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बेबाबाई नाईक होत्या. व्यासपीठावर उपसरपंच विमलबाई साळुंखे, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, साहेबराव साळुंखे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, पंचक्रोशीतील बैठकीतील श्री सदस्य, आबालवृद्ध, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य समाज, देश यांना प्रेरणादायी आहे. भक्तीच्या माध्यमातून चालणारे हे कार्य दिशा देणारे असून अंधश्रद्धा, व्यसन, आदी नकारात्मक बाबींना अटकाव करणारे आहे. देशालाच नव्हे तर जगाला या विचारांची आजच्या काळात आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जि. प. सदस्य शशिकांत साळुंखे यांनी केले.
याप्रसंगी अनेक श्री सदस्यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
प्रतिमा अनावरण कार्यक्रमामुळे गेल्या चार दिवसांपासून श्री सदस्य व ग्रामपंचायत मेहनत घेत होते. कार्यक्रमामुळे बदललेले गावाचे स्वरूप व गावात पसरलेले भावनिक वातावरण याचीच सर्वत्र चर्चा होती. श्री सदस्यांच्या अथक प्रयत्नाबरोबरच खेडगाव ग्राम पंचायतीचे माजी ग्रामविकास अधिकारी व सध्याचे विस्तार अधिकारी के.एन.माळी व गेल्या चार वर्षांपूर्वी खेडगावाची ग्रामविकास अधिकारी म्हणून धुरा सांभाळणारे एस.व्ही.सोनवणे यांचा गावासाठी प्रेरणादायी ठरावा याबाबत प्रयत्न होते.

Web Title: Nanaasaheb fanatic image unveiling ceremony at Khedgaon in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.