जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाचे केले ‘नरभक्षक महामार्ग’ नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:21 IST2018-11-16T13:21:06+5:302018-11-16T13:21:26+5:30
समांतर रस्ते कृती समितीचे आंदोलन सुरूच

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाचे केले ‘नरभक्षक महामार्ग’ नामकरण
जळगाव : जळगाव शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ ला समांतर रस्ते करण्याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेल्या समांतर रस्ते कृती समितीतर्फे या महामार्गाचे थेट ‘नरभक्षक महामार्ग’ असे नामकरण करण्यात आले. शुक्रवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता या चौकात ‘नरभक्षक महामार्ग’ असे दोन फलक लावून त्यांचे अनावरणच समितीतर्फे करण्यात आले. दरम्यान समितीच्या धरणे आंदोलनाच्या श्ुाुक्रवार, १६ रोजी दुसºया दिवशी समितीच्या सदस्यांसोबत युवाशक्ती फाऊंडेशन व साई मोरया ग्रपच्या सदस्य व पदाधिकाºयांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
शहरातील राष्टÑीय महामार्गाचा विस्तार आणि समांतर रस्ते तयार करण्याचा मागणीसाठी समांतर रस्ते कृती समितीकडून गुरुवार, १५ नोव्हेंबर सकाळी १० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. जो पर्यंत डीपीआरची प्रत आणि प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार याची लेखी हमी जिल्हाधिकारी किंवा राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक देणार नाहीत तो पर्यंत हे उपोषण मागे घेण्यात येणार नसल्याचे कृती समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच दररोज जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.