रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅकचे ‘अ’ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 14:13 IST2019-06-15T14:12:35+5:302019-06-15T14:13:59+5:30

४ पैकी ३.२३ गुण : उत्तर महाराष्ट्र विभागातून महाविद्यालय प्रथम

 NAC's 'A' rating for Raysoni Engineering College | रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅकचे ‘अ’ मानांकन

रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅकचे ‘अ’ मानांकन


जळगाव- विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्वायत्त संस्थान राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने नुकताच निकाल जाहीर केला आहे़ यामध्ये शहरातील जी़एच़रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट नॅकचे ‘अ’ मानांकन प्राप्त झाले आहे़ दरम्यान, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयात जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंटला सर्वाधिक ४ पैकी ३.२३ गुण मिळाले असून अभियांत्रिकी महाविद्यालयीन गटात उत्तर महाराष्ट्र विभागातून प्रथम स्थानावर महाविद्यालयाने आपला झेंडा रोवला आहे.
नुकत्याच झालेल्या नवीन मूल्यांकनात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटला राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने एकूण सीजीपीए ४ पैकी ३.२३ असे गुण देत ‘अ’ मानांकन दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची नवीन नॅक पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल झालेले असून झालेले बदल पूर्णता विद्यार्थी हिताचे आहेत. त्यामुळे झालेले बदल स्वीकारून नवीन पद्धतीचे मुल्यांकन करून महाविद्यालयाने हे यश मिळविले आहे. तसेच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या या पद्धतीला सामोरे जात उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
२००७ साली जळगाव शहरात सुरुवात झालेल्या रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अतिशय मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक क्षेत्रात आगेकूच केली आहे. जळगाव शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाने अग्रस्थान मिळवून संस्थेचे नाव देश पातळीवर नेऊन ठेवले आहे. संस्थेचे चेअरमन सुनील रायसोनी व कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी यांचे मार्गदर्शन मिळते त्यामुळे हे यश मिळाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालय कार्यरत राहील असा विश्वास डॉ.ए.जी.मॅथ्यु एक प्राचार्य या नात्याने मी देऊ शकतो. राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने दिलेल्या ‘अ’ मानांकनामुळे आम्हाला अधिक चांगले बदल करून चांगले विद्यार्थी घडविता येतील. महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला यश मिळाल्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन प्राचार्य डॉ.ए.जी.मॅथ्यु यांनी केले.
 

Web Title:  NAC's 'A' rating for Raysoni Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.