देऊळगाव गुजरी येथे जुन्या भांडणातून वृद्धेचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 00:55 IST2021-02-20T00:54:48+5:302021-02-20T00:55:17+5:30

देऊळगाव गुजरी येथे जुन्या भांडणातून वृद्धेचा खून झाला.

Murder of an old man in an old quarrel at Deulgaon Gujri | देऊळगाव गुजरी येथे जुन्या भांडणातून वृद्धेचा खून 

देऊळगाव गुजरी येथे जुन्या भांडणातून वृद्धेचा खून 

पहूर, ता.जामनेर  : जुन्या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन  भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेस मारहाण करण्यात आली. त्यात तिचा मृत्यू  झाल्याची घटना देऊळगाव गुजरी ता. जामनेर येथे गुरुवारी रात्री घडली. यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातील दोन जणांना अटक झाली आहे. लीलाबाई छगन तुरे (७०) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव गुजरी येथील रहिवासी भिका छगन तुरे व  विजय गणेश तेली  यांच्यात जुना वाद होता. 
शेजारीच राहत असलेल्या एका महिलेशी भिका हा बोलत असल्याचे रेखा विजय तेली हिने पाहिले.  आपल्याबद्दल भिका हा रेखाला काही तरी बोलत आहे. 
या संशयावरून  गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भिका तुरे याच्याशी  विजय  तेली,रेखा तेली, आकाश तेली व हर्षल तेली यांनी भांडण केले. याचे रूपांतर हाणामारीत झाले. 
ही हाणामारी सोडविण्यासाठी  भिका याची आई लीलाबाई छगन तुरे गेल्या. यावर वरील चारही जणांनी लीलाबाई हिला   लाथ बुक्यांनी जबर मारहाण केली. यात लीलाबाई यांना मुक्का मार लागला. रात्री लीलाबाई व भिका यांना समजू शकले नाही. गुरुवारी रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली.          

Web Title: Murder of an old man in an old quarrel at Deulgaon Gujri