शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्का लागल्याने १३ वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून; मध्यप्रदेशातील मारेकऱ्यांची गुन्ह्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:20 IST

तेजसच्या खूनामागे धक्का लागल्याचे किरकोळ कारण, दोन अटकेत, तिसरा फरार

algaon Crime: जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस गजानन महाजन या १३ वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. तेजसची गळा चिरून खून केल्याप्रकरणी दोनजणांना बुधवारी अटक करण्यात आली. यातील तिसरा संशयित मात्र पसार आहे. धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन जणांनी तेजसला मारहाण केली होती. त्यानंतर एकाने तेजसच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे.

हरदास डेमशा वास्कले (वय ३५, रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सुरेश नकल्या खरते (वय ३४, रा. धोपा, ता. झिरण्या, ता. खरगोन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील तिसरा आरोपी रिचडिया तुकाराम कटोले (२०, रा. रा. नांदीया, ता. भगवानपूरा) याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. धक्का लागल्याच्या कारणासाठी तेजसची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रिंगणगाव येथील आठवडे बाजारात सोमवारी सायंकाळी सुरेश खरते व रिचडीया कटोले हे फिरत असताना तेजस यास सुरेश वास्कूले याचा धक्का लागला होता. यावरुन वाद होऊन सुरेश वास्कूले याने तेजसला शिवीगाळ करून मारहाण केली. रिचडीया कटोले याने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार करून ठार केले. नंतर त्याला झाडाझुडपांत नेऊन टाकून दिले.

कसे सापडले आरोपी?

घटना घडल्यानंतर मंगळवारी सकाळीच वास्कले हा पत्नी समिता व मुलांसोबत कामानिमित्त आणि त्याच्या शेजारी राहणारा सुरेश खरते हा नातेवाइकांच्या लग्नासाठी गावातून पसार झाले. गावात शेतीकामासाठी आले असताना ते काम अपूर्ण सोडून हे दोघे गायब झाल्याने संशय बळावला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या मदतीने वास्कले हा फैजपूर-रावेर मार्गावर लावण्यात आलेल्या नाकेबंदीत अलगद सापडला. तर दुसरा आरोपी सुरेश खरते याला थोपा घाटात जाऊन पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या चौकशीत या दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे.

दरम्यान, माझ्या मुलाचा नरबळीच असून या प्रकरणाचा खोलवर तपास करून न्याय मिळावा, अशी मागणी मयत मुलाचे वडील गजानन महाजन यांनी केली आहे. याविषयी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.'माझ्या शेतात काम करणारा एक मजूर घटना घडण्याच्या अगोदरपासून संशयितांसोबत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे, असं गजानन महाजन यांनी सांगितले. या मजुरावर माझा संशय असून तो मोकाट असल्याचा दावाही त्यांनी निवेदनातून केला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस