शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

गाळेकारवाईसाठी मनपाकडून जोरदार हालचाली सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:28 IST

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या भाड्यातील घसाऱ्याची रक्कम कमी करून देखील गाळेधारक थकीत रक्कम भरत नसल्याने आता ...

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या भाड्यातील घसाऱ्याची रक्कम कमी करून देखील गाळेधारक थकीत रक्कम भरत नसल्याने आता मनपाकडूनच कारवाईसाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात मनपाने पोलीस बंदोबस्त मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मनपा मालकीच्या २२ मार्केटमधील २३८७ गाळेधारकांची कराराची मुदत सन २०१२ मध्येच संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील गाळे कारवाईबाबत आदेश दिले आहेत. मात्र, मनपाने लावण्यात आलेले भाड्याचे दर हे अवास्तव असल्याने गाळेधारकांकडून भाडे भरण्यास नकार दिला जात होता. गाळेधारकांच्या मागणीप्रमाणे आमदार सुरेश भोळे यांनी गाळ्यांचे पुर्नमुल्यांकनाचे आदेश देवून गाळ्यांचा घसारा रक्कम कमी करून नव्याने बीले वाटप करण्यात आली. त्यानुसार फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांकडील थकीत रक्कम तब्बल ८८ कोटी रुपयांनी कमी करण्यात आली.दोन गाळेधारकांनी भरली १० लाखांची रक्कममनपा आयुक्तांनी दिलेला अल्टिमेटम संपायला तीन दिवस शिल्लक असताना सोमवारी सायंकाळी फुले मार्केटमधील दोन गाळेधारकांनी प्रत्येकी १० लाख प्रमाणे २० लाखांची रक्कमेचा धनादेश आयुक्त उदय टेकाळे याच्यांकडे सादर केला. गाळेधारकांना अजून तीन ते चार दिवस भाडे भरण्याची मूदत असून, गाळेधारकांनी रक्कम भरण्याचे आवाहन मनपाकडून करण्यात येत आहे.गाळेधारकांना सर्व संधी देवूनही मिळत नाही भाड्याची रक्कमआतापर्यंत मनपा असो वा राजकीय प्रतिनिधींकडून गाळेधारकांवर अन्याय होणार नाही. म्हणून गेल्या सात वर्षांपासून कारवाई देखील होवू दिली नाही. तसेच गाळेधारकांना जास्त वाटत असलेली भाड्याची रक्कम देखील मनपाने आता कमी केली आहे. मात्र, तरीही गाळेधारक मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याने आता गाळेधारकांना मिळत असलेले राजकीय समर्थन देखील कमी होण्याची शक्यता आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आता गाळेधारकांना अनेक संधी देवूनही भाड्याची रक्कम भरायला तयार नसल्याने आता मनपा प्रशासन घेईल तोच निर्णय मान्य करावा, असे मत खासगीत व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव