मुंबईहून-नागपूरसाठी १७ रोजी विशेष रेल्वे;
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 17:47 IST2023-06-10T17:44:29+5:302023-06-10T17:47:08+5:30
आता शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी रेल्वेतर्फे १७ जून रोजी मुंबई -नागपूर साठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे वन वे असेल.

प्रतिकात्मक फोटो
वासेफ पटेल -
जळगाव : उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपण्यात आहेत. आता शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी रेल्वेतर्फे १७ जून रोजी मुंबई -नागपूर साठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे वन वे असेल.
 क्रमांक ०२१३९  एलटीटी -नागपूर ही विशेष गाडी मुंबई येथून रात्री साडेबारा वाजता सुटणार असून नाशिकला सकाळी ४:१२ वाजता,  मनमाड येथे सकाळी ५:१७  वाजता,   भुसावळला सकाळी ८:०५  वाजता आणि नागपूरला दुपारी ३:३२ वाजता पोहचेल.  गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर बडनेरा, वर्धा असे थांबे देण्यात आले आहेत. असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.