मुक्ताईनगर तालुक्यात कंटेनरची मोटारसायकलला धडक- सिंगनूर येथील पती-पत्नी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:57 IST2018-09-16T18:55:39+5:302018-09-16T18:57:49+5:30
दिशादर्शक फलक नसल्यानेही घेतले बळी

मुक्ताईनगर तालुक्यात कंटेनरची मोटारसायकलला धडक- सिंगनूर येथील पती-पत्नी ठार
मुक्ताईनगर/उचंदे, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर-कुºहा रस्त्यावर पुरनाड फाट्याच्या पुढे राशाबरड जवळ कंटेनरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत सिंगनूर, ता.रावेर येथील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना १६ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.
फिर्यादी जीवन ताराचंद भालशंकर (३२, रा.मस्कावद, ता.रावेर) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची बहीण संध्या किरण मोरे व तिचे पती किरण मानाजी मोरे (दोन्ही रा.सिंगनूर, ता.रावेर) हे त्यांच्याकडील मोटारसायकल (एमएच १९ सीटी ८५३५) ने मलकापूरकडून पुरनाडकडे येत होते. तेव्हा कंटेनर (आरजे १८ जीबी २९५५) वरील चालकाने भरधाव वेगाने कंटेनर चालवून मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. पती-पत्नी हे १५ रोजी दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील सुपो पळशी या देवस्थानाला दर्शनासाठी गेले होते आणि रविवारी परत येत असताना हा अपघात झाला.
पुरनाड फाट्याजवळील राशाबरड जवळ असलेल्या वळण हे अतिशय धोकेदायक आहे. या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अपघात होऊन अनेक जण ठार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या ठिकाणी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे हे गरजेचे आहे. पती-पत्नीच्या निधनामुळे सिंगनूर गावावर शोककळा पसरली आहे.