पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपीवर एमपीडीएची कारवाई
By संजय पाटील | Updated: October 20, 2023 11:40 IST2023-10-20T11:36:38+5:302023-10-20T11:40:54+5:30
तन्वीर हा पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत.

पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपीवर एमपीडीएची कारवाई
अमळनेर - मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊनही सुधारत नसल्याने शहरातील सराईत गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) याच्यावर एमपीडीए कारवाई करण्यात आली, २० रोजी पहाटे त्याला ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले.
तन्वीर हा पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, बंद घरात घरफोडी, चोरीचे सात गुन्हे, पेट्रोल पंपावरील चोऱ्या, दुकानाचे शटर तोडून चोरी, दंगली, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. प्रतिबंधक कारवाई करूनही तो सुधारत नसल्याने अखेर त्याच्यावर जिल्हा दंडाधिकार्यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले.