दलित वस्ती निधीच्या अपव्यय व भ्रष्टाचाराविरोधात १५ पासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:50+5:302021-07-14T04:19:50+5:30
अमळनेर : नगर परिषद तसेच तालुक्यातील गावांमधील दलित वस्त्यांचा पाहिजे तसा विकास अजूनही झालेला नाही. मात्र तरीही तो निधी ...

दलित वस्ती निधीच्या अपव्यय व भ्रष्टाचाराविरोधात १५ पासून आंदोलन
अमळनेर : नगर परिषद तसेच तालुक्यातील गावांमधील दलित वस्त्यांचा पाहिजे तसा विकास अजूनही झालेला नाही. मात्र तरीही तो निधी संबंधित ठिकाणी न वापरता ज्या ठिकाणी दलित समूह नाहीच, अशा ठिकाणी त्या निधीचा वापर केला जात आहे व वापरला गेला आहे. त्याविरोधात १५ पासून आंदोलन करण्यात येणार आहे.
नगर परिषद व पंचायत समिती, अमळनेर यांना अर्जही दिले असून त्यावर त्यांच्यामार्फत पाहिजे तसे लक्ष दिले गेलेले नाही. अनेक गावांच्या दलित वस्त्यांची सुधारणा झालेली नसून तरीही तो निधी इतर ठिकाणी वापरला जात आहे.
नगर परिषदेचे जबाबदार तसेच संबंधित गावांचे ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर चौकशी करून शासनाच्या वतीने फौजदारी स्वरूपाचा व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत १५ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार समाधान मैराळे यांनी जिल्हाधिकारी जळगाव व गटविकास अधिकारी अमळनेर यांच्याकडे केली होती. मात्र, संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणून १५ जुलैपासून आंदोलन करण्यात येणार आहे.