मोटारसायकल व दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:33+5:302021-07-14T04:19:33+5:30
दोन जण जळगावचे तर एक भराडीचा रहिवासी पाळधी, ता जामनेर : चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ...

मोटारसायकल व दुचाकी
दोन जण जळगावचे तर एक भराडीचा रहिवासी
पाळधी, ता जामनेर : चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. ही घटना जळगाव - औरंगाबाद रोडवर पाळधीनजीक दत्त मंदिराजवळ सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.
धनंजय गंगाराम सपकाळ ( ४०, रा. स्टेट बँक कॉलनी, जळगाव), पंकज मोहन तायडे(३०, वाल्मीक नगर, जळगाव) आणि प्रवीण प्रकाश पाटील(३८, भराडी
ता. जामनेर) अशी या ठार झालेल्यांची नावे आहेत. धनंजय व पंकज हे फॉर्च्युन फायनान्स कंपनीत कामाला होते.
वाहन कर्जासंदर्भात कंपनीचे काम आटोपून धनंजय व पंकज हे मोटारसायकलीने (क्र. एमएच.१९/ डीआर १४१९) जळगावकडे परत होते. त्याचवेळी पाळधीनजीक चारचाकी (क्र. एमएच. २०/सीजी ८०००) व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात धनंजय व प्रवीण हे दोघे जण जागीच ठार झाले तर पंकज तायडे याला जळगाव येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
अपघात इतका भयानक होता की, तीनही जणांचे हात,पाय हे शरीरापासून वेगळे झाले होते. घटनेची माहिती मिळताच पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील,
ग्रामपंचायत सदस्यांनी मदतकार्य केले. पहूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र देशमुख, कॉ. भारत लिंगायत, अनिल राठोड, रवींद्र मोरे यांनी पंचनामा
केला. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल देवडे करीत आहेत.