ट्रेलरला मोटारसायकल आडवी लावून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:09 IST2019-06-24T01:08:15+5:302019-06-24T01:09:11+5:30

भुसावळ , जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रेलरला मोटारसायकल आडवी लावून ट्रेलर चालक व ...

The motorcycle was abducted by the trailer | ट्रेलरला मोटारसायकल आडवी लावून लुटले

ट्रेलरला मोटारसायकल आडवी लावून लुटले

ठळक मुद्देसाडेनऊ हजार रुपये रोख मोबाईल हिसकावून आरोपी फरारराष्ट्रीय महामार्गावरील रात्रीची घटनाबाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रेलरला मोटारसायकल आडवी लावून ट्रेलर चालक व किन्नरला मारहाण करून त्याच्याकडून साडेनऊ हजार रुपये रोख व १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून घेण्यात आल्याची घटना २२ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.
ट्रेलर (क्रमांक सीजी-४-एमए-७७२५) हा रात्री दीडच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नागपूरकडे जात होता. यावेळी ही गाडी न्यू रूप टाइल्स या दुकानासमोर आली. दोन अज्ञात इसमांनी या ट्रेलरसमोर मोटारसायकल आडवी लावली व गाडीत प्रवेश केला. यावेळी दोन्ही अज्ञात व्यक्तींनी चालक अजयकुमार शैलेंद्रकुमार तिवारी (वय ३२, रा.बी.एस.वाय. वरोडा, जि. दुर्ग, छत्तीसगड) यास व त्यांच्यासोबत असलेल्या क्लिनर यास मारहाण केली. यानंतर त्याच्याजवळ खर्चासाठी असलेले साडेनऊ हजार रुपये रोख तसेच १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल असे एकूण साडेचोवीस हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला.
चालक तिवारी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात २३ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांनी भेटी दिल्या. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत.

Web Title: The motorcycle was abducted by the trailer