हरताळे फाट्याजवळ दुचाकी अपघात एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 19:25 IST2018-03-31T19:25:03+5:302018-03-31T19:25:03+5:30
चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुकेश गोपाळ सोनवणे (वय ३५) हे ठार तर एक जण जखमी झाला.

हरताळे फाट्याजवळ दुचाकी अपघात एक ठार, एक जखमी
आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.३१ : चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुकेश गोपाळ सोनवणे (वय ३५) हे ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना आशिया महामार्ग क्रमांक ४६ वरील हरताळे फाट्यावर ३१ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.
नीलेश रघुनाथ चौधरी रा. अंजाळे तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३१ रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान अंजाळेहून कर्की गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात पांढºया रंगाच्या कारने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मुकेश गोपाळ सोनवणे (वय ३५) हे जागीच ठार झाले तर फिर्यादी नीलेश स्वत: ही जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार न थांबता वेगाने भुसावळकडे निघून गेली.फिर्यादी नीलेश चौधरी व मयत सोनवणे हे आपल्या मित्राला मुलगा झाला त्याला पाहण्यााठी अंजाळे येथून सहा जण तीन दुचाकीवरुन कर्की तालुका मुक्ताईनगर येथे जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. तपास सहायक फौजदार अनिल अडकमोल करीत आहेत.