आईच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:34 IST2020-02-14T12:34:09+5:302020-02-14T12:34:53+5:30

लोणीत हळहळ, एमआयडीसीतील घटना

The mother died after the shock of her mother's death | आईच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही सोडला प्राण

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही सोडला प्राण

जामनेर / वाकडी, जि.जळगाव : आई ही प्रत्येकालाच प्रिय असते...अगदी मुलगा कितीही मोठा झाला तरी आईचा लळा त्याला असतोच याची प्रचिती जामनेर तालुक्यातील वाकडी येथील कुटुंबाबत आली.आईचे निधन होऊन अवघे चोवीस तास होत नाही तोच मुलानेही प्राण सोडल्याची घटना जवळच असलेल्या लोणी येथील गायकवाड कुटुंबात घडली. जळगाव येथे घडलेल्या या घटनेची माहिती लोणी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाकडी येथून जवळच असलेल्या लोणी येथील सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी एकनाथ संपत गायकवाड यांच्या आई बनाबाई संपत गायकवाड ( वय ९५) यांचे बुधवारी १२ रोजी रात्री ९ वाजता निधन झाले़ वृद्ध आईचे निधन झाल्याने कुटुंबात शोक व्यक्त केला जात होता. आईच्या निधनाचा त्यांना मोठा धक्का गायकवाड यांना बसला होता. हा धक्का सहन न झाल्याने एकनाथ गायकवाड यांचेही १३ रोजी गुरूवारी पहाटे ३़३० वाजता निधन झाले़ यामुळे कुटुंबावर आघाताच झाला.
गावात वृत्त धडकले
आईपाठोपाठ मुलाच्या निधनाने लोणी गाावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे़ हे कुटुंब सध्या शांती निकेतन हौसिंग सोसायटी एमआयडीसी परिसर जळगाव येथे वास्तव्यास आहे. एकनाथ गायकवाड यांच्यावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले, पत्नी, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. हे कुटुंब उच्च्शिक्षित असून सरकारी नोकरीत आहेत़

Web Title: The mother died after the shock of her mother's death

टॅग्स :Jalgaonजळगाव