शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आई भवानी तुझ्या कृपेने़...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:37 PM

‘उडान’ स्रेहसंमेलन : हिंदी, मराठी, अहिराणी गाण्यांवर थिरकली तरूणाई

जळगाव- आई भवानी तुझ्या कृपेने़...पहिली बार है जी... ये इतना जरूरी कैसे हुआ...ओ लडकी आंख मारे... अशा हिंदी, मराठी गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कार करून उपस्थित प्रक्षेकांकडून वन्समोअरची दाद मिळवून घेतली. निमित्त होते ते नुतन मराठा महाविद्यालयातील ‘उडान’ वार्षिक स्रेहसंमेलनाचे.शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाच्या ‘उडान’ स्रेहसंमलनाचे गुरूवारी मोठ्या जल्लोषात उद्घाटन झाले़ यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएनआयएफडी संस्थेच्या संचालिका संगिता पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक अकबर पटेल, संमेलनप्रमुख प्रा.डॉ.डी.एल.पाटील, तिन्ही उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.जी.पाटील, डॉ.एस.ए.गायकवाड, प्रा.डॉ.आर.बी.देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली.जीवनात शिस्तपालक व मूल्यविवेक जपणे महत्वाचेजीवनात मनसोक्तपणे जगत असताना शिस्तपालन करणे व मूल्यविवेक जपणेदेखील महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा पेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी मार्गदर्शन करताना केले़ त्यानंतर यावेळी महाविद्यालयाचे हलगी सम्राट नाटक दाखविण्यात आले. नाटकातील सागर भंडगर याची निवड झाल्याबद्दल मानव्यरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला़वाय-फाय सुविधेचे अनावरणमहाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाय-फाय सेवा सुविधेचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन उकृष्ट व्यासपीठ असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व प्रस्तावना प्रा.डॉ.अशफाक शेख यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ.आर.बी.देखमुख यांनी मानले.सांस्कृतीक कार्यक्रमांनी आणली रंगतउद्घाटनानंतर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सुरुवातीला एकल, समुह व शास्त्रीय गायन घेण्यात आले. यात गणेशवंदना सुुरुवात करत मराठी, हिंदी सिनेमाची गिते, विविध लोकगिते, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या सादर झाल्या. खंडरायाच्या लग्नाला... क्या हुआ तेरा वादा... चांदण झाली रात... वाढीव दिसतय राव... यासह मराठी अहिराणी रिमिक्स गितांनी उपस्थितांची मने जिंकत टाळ्याचा प्रतिसाद मिळविला.यानंतर समुह, एकल नृत्य सादर झाले. यात आई भवानी तुज्या कृपेने...पहिली बार है जी... ये इतना जरुरी कैसे हुआ... ओ लडकी आंख मारे... या गितांवरील नृत्यांनी वन्समोअर मिळवत विद्यार्थ्यांना फिरकायला भाग पाडले. योगेश पवार याने योगा नृत्य करीत वाहवा मिळवली. मुकेश सावकारे याने एकपात्री नाटक सादर केले. तसेच आदिवासी समाजातील गिताचे समुह नृत्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.शुक्रवारीसमारोपमहाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध परीक्षांमधील गुणवंत तसेच पीएच.डी धारक शिक्षक, स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, महिला व बालकल्याण अधिकारी व्ही.आय.परदेशी यांची उपस्थिती राहील.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव