पावसासाठी तरुणाचे महादेवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:14 IST2018-08-12T00:13:50+5:302018-08-12T00:14:09+5:30

पाचोरा तालुक्यात पाण्याने भरला गाभारा

 The monsoon of the youth is ready for rain | पावसासाठी तरुणाचे महादेवाला साकडे

पावसासाठी तरुणाचे महादेवाला साकडे

शिंदाड, ता.पाचोरा, जि.जळगाव : राज्यात कुठेही पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पिकाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. पिण्याचे पाण्याचेदेखील खूप हाल होत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, पाऊस लवकर पडावा म्हणून शिंदाड येथील तरुणांनी महादेवाला साकडे घातले आहे.
रात्री शिंदाड येथील तरुण मंडळींनी महादेव मंदिराचा संपूर्ण गाभारा पाण्याने भरला असून, लवकर पाऊस पडवा म्हणून प्रार्थना केली आहे.
शिंदाड येथील ग्राम दैवत सिद्धेश्वर मंदिराचा सात ते आठ फूट गाभारा येथील राजे संभाजी ग्रुप व जय श्रीराम ग्रुपच्या ५०-६० तरुणांनी संपूर्ण गाभारा पाण्याने भरलेला आहे. गाभारा भरल्यावर पाऊस येतो, अशी जुन्या जाणकारांची श्रद्धा आहे. त्यामुळे आशावादी म्हणून येथील तरुणांनी श्रद्धेपोटी हा गाभारा पाण्याने भरला आहे.

Web Title:  The monsoon of the youth is ready for rain