माकडाने लांबवला स्मार्टफोन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 21:32 IST2021-03-16T21:32:35+5:302021-03-16T21:32:56+5:30
माकडाने घरात घुसून त्याचा स्मॉर्ट फोन लांबवल्याची घटना नांदेड येथे घडली.

माकडाने लांबवला स्मार्टफोन...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड, ता. धरणगाव : गावातील एक युवक आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला असताना या संधीचा फायदा घेऊन माकडाने घरात घुसून त्याचा स्मॉर्ट फोन लांबवल्याची घटना नांदेड येथे घडली.
गावातील प्रशांत अशोक जंगले हा १५ रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेला असता माकडाने या घरात घुसून त्याचा स्मार्टफोन लांबवून गावाच्या मुख्य गावठाण चौकात घेऊन आला. मोबाईलवर कॉल आले असताना हे माकड मोबाईल चक्क कानाला लावत होते. अर्धा ते पाऊण तासापर्यंत हा खेळ सुरू होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी चौकात जमा होती. शेवटी माकडाला एकाने सायकलचे टायर मारून फेकल्याने पलायन करत असताना माकडाच्या हातातील मोबाईल खाली पडला आणि या नाट्यावर पडदा पडला.