अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्याला तीन वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 20:02 IST2019-04-01T20:02:47+5:302019-04-01T20:02:57+5:30
२६ जानेवारी २०१६ रोजी लमांजन येथे ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी हे साहेबराव पाटील याच्या शेतात मजुरीने वांगे तोडण्याच्या कामासाठी गेली होती.

अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्याला तीन वर्षे कारावास
जळगाव : दहा वर्षीय मुलीशी दारुच्या नशेत अश्लिल चाळे करणाऱ्या साहेबराव दामू पाटील (रा.लमांजन, ता.जळगाव) याला न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी सोमवारी हा निकाल दिला.
२६ जानेवारी २०१६ रोजी लमांजन येथे ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी हे साहेबराव पाटील याच्या शेतात मजुरीने वांगे तोडण्याच्या कामासाठी गेली होती. तेव्हा साहेबराव याने दारुच्या नशेत पीडितेशी अश्लिल संभाषण करुन लैंगिक चाळे केले होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी येऊन आजीला हा प्रकार सांगितला होता.
याप्रकरणी आजीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला विनयभंग, पोस्को ७, ८ व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला सर्व कलमाखाली दोषी धरण्यात आले. सरकारतर्फे अॅड.शिला गोडंबे यांनी काम पाहिले.