जामनेर पालिकेतर्फे मोकाट गुरे जप्ती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 17:12 IST2019-12-01T17:10:08+5:302019-12-01T17:12:02+5:30

रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने गुरे जप्तीची मोहीम सुरू केली आहे.

Mokat cattle seizure campaign by Jamner Municipality | जामनेर पालिकेतर्फे मोकाट गुरे जप्ती मोहीम

जामनेर पालिकेतर्फे मोकाट गुरे जप्ती मोहीम

ठळक मुद्देपहिल्या दिवशी १२ गुरे पकडलीगुरे पकडून केली जळगावी रवानामोकाट गुरांच्या मालकांनी बंदोबस्त करावा अन्यथा पालिका गुरांचा मालकावर कारवाई करेलवाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने गुरे जप्तीची मोहीम सुरू केली आहे

जामनेर, जि.जळगाव : रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने गुरे जप्तीची मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी शनिवारी १२ गुरे पकडण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट गुरांचा त्रास वाढल्याने गुरे जप्तीची मोहीम मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे.
१२ गुरे पकडून जळगाव येथे गोशाळेत पाठविण्यात आले आहे यावेळी दत्तू झोरे, वसंत माळी, दीपक मिस्त्री, सागर महाले, व आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
तसेच मोकाट गुरांच्या मालकांनी बंदोबस्त करावा अन्यथा पालिका गुरांचा मालकावर कारवाई करेल, असे मुख्याधिकारी राहुल पाटील यानी सांगितले.
 

Web Title: Mokat cattle seizure campaign by Jamner Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.