साध्या पद्धतीने साजरा होणार मोहरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:45+5:302021-08-13T04:20:45+5:30

जळगाव : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा मोहरम साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या ...

Moharram will be celebrated in a simple way | साध्या पद्धतीने साजरा होणार मोहरम

साध्या पद्धतीने साजरा होणार मोहरम

जळगाव : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा मोहरम साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करून साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

यावर्षी मोहरमच्या नवव्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी शहादत की रात तसेच योम-ए-आशुरा १० व्या दिवशी अर्थात १९ ऑगस्ट रोजी येत असून, त्यानिमित्त मातम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूक काढता येणार नाही. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खासगी मातमदेखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम / दुखवटा करू नये. वाझ / मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

..तर स्थानिक प्रशासनाची घ्यावी लागणार परवानगी

ताजिया, आलम न काढण्याचेही सूचित करण्यात आले आहे. तसेच सबिल / छबिल बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीने पाण्याचे वाटप करावे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे, असे सूचना पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Moharram will be celebrated in a simple way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.