मोदींची गॅरंटी भारत होणार तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

By विलास बारी | Updated: March 5, 2024 17:29 IST2024-03-05T17:28:11+5:302024-03-05T17:29:10+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगावात सांगितले.

modi guarantee India will become the third largest economy said amit shah | मोदींची गॅरंटी भारत होणार तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मोदींची गॅरंटी भारत होणार तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ११ व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ५ व्या क्रमांकावर पोहचली आहे. आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ही जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगावात सांगितले.

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार या निमित्ताने भाजपाकडून करण्यात येत आहे. भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोचहविण्यासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले. परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? असा प्रश्न त्यांनी युवकांना केला.विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: modi guarantee India will become the third largest economy said amit shah