बाप्पाच्या खरेदीसाठी आलेल्या भक्तांचे मोबाईल लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:37+5:302021-09-12T04:19:37+5:30

गणेश चतुर्थीनिमित्त टॉवर चौकात नागरिकांनी गणेशमूर्ती, पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. राधेशाम कैलास पांडे (वय २२, रा. शनिपेठ) ...

The mobiles of the devotees who came to buy Bappa were taken away | बाप्पाच्या खरेदीसाठी आलेल्या भक्तांचे मोबाईल लांबविले

बाप्पाच्या खरेदीसाठी आलेल्या भक्तांचे मोबाईल लांबविले

गणेश चतुर्थीनिमित्त टॉवर चौकात नागरिकांनी गणेशमूर्ती, पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. राधेशाम कैलास पांडे (वय २२, रा. शनिपेठ) यांच्या खिशातील ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी काढून घेतला होता. पांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. यानंतर पोलीस कर्मचारी रतन गिते, मनोज पाटील, भास्कर ठाकरे, गणेश पाटील, संतोष खवले यांनी लागलीच टॉवर चौक, जिल्हा परिषद भागात गस्त सुरू केली. संशयितपणे फिरणाऱ्या तरुणांची चौकशी केली. यात विजय पाटील व धर्मेंद्र भावसार हे दोघे पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत होते. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून पांडे यांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांनी आणखी मोबाईल चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The mobiles of the devotees who came to buy Bappa were taken away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.