रामनगर येथील घरातून मोबाईल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:35 IST2019-09-14T22:35:01+5:302019-09-14T22:35:48+5:30

पोलिसात गुन्हा : मोबाईल चोरट्यास अटक

 Mobile phone removed from Ramnagar house | रामनगर येथील घरातून मोबाईल लांबविला

रामनगर येथील घरातून मोबाईल लांबविला

जळगाव- मेहरूण परिसरामधील रामनगरात वास्तव्यास असलेल्या अनिता प्रवीण पाटील यांच्या घरातून चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे़ दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी अरबाज सलमान पटेल (वय-१९, रा़ रामनगर) या मोबाईल चोरट्यास अटक केली असून त्याच्याजवळून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे़
रामनगरात अनिता प्रवीण पाटील या कुटूंबीयासह वास्तव्यास आहेत़ गुरूवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता़ याबाबत शनिवारी अनिता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान, मोबाईल चोरटा हा रामनगरातीलच असल्याची पोलिसांनी मिळाली़ त्यानुसार रामकृष्ण पाटील, सतिश गर्जे, महेंद्र गायकवाड, सचिन पाटील, मुकेश पाटील यांनी रामनगर येथून अरबाज सलमान पटेल याला अटक करून त्याच्याजवळून मोबाईल हस्तगत केला आहे़

Web Title:  Mobile phone removed from Ramnagar house