शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने घेतला तरुणाचा जीव, रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 17:36 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.४५ वाजता भुसावळकडून मनमाडकडे सचखंड एक्सप्रेस जात असताना एक तरुण पिंप्राळा रेल्वे गेटजवळ मोबाईलवर बोलत होता

ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.४५ वाजता भुसावळकडून मनमाडकडे सचखंड एक्सप्रेस जात असताना एक तरुण पिंप्राळा रेल्वे गेटजवळ मोबाईलवर बोलत होता

जळगाव : मोबाईलवर बोलत असताना सचखंड एक्सप्रेसच्या मागील बोगीखाली आल्याने २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९.४५ वाजता पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. हा तरुण परप्रांतीय असावा अशी शक्यता लोहमार्ग पोलिसांनी वर्तविली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.४५ वाजता भुसावळकडून मनमाडकडे सचखंड एक्सप्रेस जात असताना एक तरुण पिंप्राळा रेल्वे गेटजवळ मोबाईलवर बोलत होता. रेल्वे रुळाजवळच तो उभा होता. रेल्वे पुढे गेली असे समजून तो रुळ ओलांडायला गेला, परंतु तेव्हा शेवटची बोगी पास होत होती व त्याच बोगीत हा तरुण अडकला अन् त्यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. खांब क्र.४१९य२ दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्गचे सहायक फौजदार राजेश पुराणिक, सचिन भावसार व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओळख पटविण्यासाठी त्याची अंगझडती घेतली असता त्यात काहीच मिळाले नाही. त्यामुळे त्याची संध्याकाळपर्यंत ओळख पटलेली नव्हती. अंगात लालरंगाचा शर्ट, तपकीरी रंगाची पँट आहे. अंदाजे वय २५ ते ३० आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातrailwayरेल्वे