जळगावमध्ये मनसेने घातले गढूळ राजकारणाचे सामुहिक श्राध्द
By Ajay.patil | Updated: October 12, 2023 18:36 IST2023-10-12T18:35:50+5:302023-10-12T18:36:42+5:30
मनसेचे माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली जळगावातील मेहरुण येथील स्मशानभूमीत हे आंदोलन करण्यात आले.

जळगावमध्ये मनसेने घातले गढूळ राजकारणाचे सामुहिक श्राध्द
जळगाव - पक्षांची फोडाफोडी, राजकारण्यांकडून एकमेकांवर होणारी टीका, यामुळे सध्या राजकारणाचा स्तर खूपच खालावला असल्याचा आरोप करत याचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी मेहरूण स्मशानभूमीत जाऊन शिंदे-फडणवीस सरकारसह शंभर राजकारण्यांचे श्राद्ध घातले. पितृपक्षानिमित्त १०० मटके आणून श्राद्ध घालत गढूळ राजकारणाचा निषेध यावेळी कारण्यात आला.
मनसेचे माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली जळगावातील मेहरुण येथील स्मशानभूमीत हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, भडगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपमहानागराध्यक्ष आशिष सपकाळे, उपजिल्हा संघटक राजेंद्र निकम, चेतन आढळकर, राहुल सोनटक्के, सचिव महेंद्र सपकाळे, राहुल चव्हाण, हरीओम सूर्यवंशी, खुशाल ठाकूर, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, राजेंद्र डोंगरे, दीपक राठोड, साजन पाटील, विकास पाथरे, प्रमोद रूले आदी उपस्थित होते. स्मशानभूमीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल शंभर मटके आणले होते. प्रत्येक मटक्यासमोर पान घालून घास अर्पण करुन श्राध्द घातले