बेपत्ता युवती प्रियकरासह पोलीस स्टेशनला दाखल
By Admin | Updated: May 22, 2017 17:04 IST2017-05-22T17:04:01+5:302017-05-22T17:04:01+5:30
पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील युवती, बदरखे येथील जवान हे प्रेमीयुगुल 21 रोजी पाचोरा पोलीस स्टेशन ला स्वत: हून हजर झाले.

बेपत्ता युवती प्रियकरासह पोलीस स्टेशनला दाखल
पाचोरा, दि.22- तालुक्यातील आखतवाडे येथील युवती, बदरखे येथील जवान हे प्रेमीयुगुल 21 रोजी पाचोरा पोलीस स्टेशन ला स्वत: हून हजर झाले. भारतीय सैन्यदलातील हा जवान अरुणाचल प्रदेशात नियुक्तीवर आहे. 3 महिने गावी बदरखे येथे सुट्टीवर आलेला असताना आखतवाडे येथील 21 वर्षीय युवतीसोबत त्याचे प्रेमसंबध जुळले. मुलगी भुसावळ येथे डी.टी.एड.चे शिक्षण घेत असल्याने कॉलेजला जात असल्याचे तिने सांगितले. 13 मे रोजी या जवानाची सुट्टी संपल्याने तो कामावर हजर होण्यासाठी जात होता. याचवेळी ही मुलगी या जवाना सोबतच पळून गेली. मात्र जवानाला डय़ुटीवर हजर होण्यास अडचण येत असल्याने त्याने आपल्या वरिष्ठ अधिका:यांशी संपर्क साधला. त्यांनी संबधित जवानाला तत्काळ पाचोरा पोलीस स्टेशन ला हजर होण्याचे सांगितले. त्यानुसार दोघे पाचोरा पोलीस स्टेशनला हजर झाले. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या आईवडिलांनी यापूर्वीच पोलिसात दिली आहे.