अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; लग्नाचे आमिष दाखवून नेले होते पळवून
By विलास.बारी | Updated: September 13, 2022 23:21 IST2022-09-13T23:21:13+5:302022-09-13T23:21:54+5:30
संशयिताला जालना जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; लग्नाचे आमिष दाखवून नेले होते पळवून
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव: लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेली १७ वर्षीय मुलगी अत्याचारातून गर्भवती राहिली आहे. विशाल तान्हाजी पवार (रा.धावडा ता.भोकरदन जि.जालना) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. मंगळवारी संशयिताला जालना जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून, २०२१ मध्ये नशिराबाद हद्दीत ऊसतोडीसाठी आलेली होती. आरोपीही त्याच कामासाठी आलेला होता. नशिराबाद येथे असताना, या मुलीला लग्नाचे आमिष दाखवत विशाल तान्हाजी पवार याने तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक साळुंखे व पथकाने मंगळवारी आरोपीला जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतले. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे करीत आहे.