पहिल्याच बैठकीत मंत्र्यांनी काढला अधिकाऱ्यांचा बाप; मंत्री संजय सावकारे यांचा संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:34 IST2025-01-05T13:32:52+5:302025-01-05T13:34:25+5:30
केंद्रात आणि राज्यात महायुतीचे शासन असताना खुद्द मंत्र्यांनी ‘टोल बंद’चा इशारा देण्याची भूमिका घेतल्याने अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

पहिल्याच बैठकीत मंत्र्यांनी काढला अधिकाऱ्यांचा बाप; मंत्री संजय सावकारे यांचा संताप अनावर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी पहिल्याच बैठकीत ‘एनएचएआय’च्या (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) अधिकाऱ्यांचा ‘बाप’ काढल्याने अनेकांनी खासगीत नापसंती व्यक्त केली. याउपर महामार्गावरच्या अडचणी दूर न केल्यास नाक्यावर टोलही घेऊ देणार नाही, अशा शब्दात तंबीही दिली. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे शासन असताना खुद्द मंत्र्यांनी ‘टोल बंद’चा इशारा देण्याची भूमिका घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ‘दिशा’ची शनिवारी येथील जिल्हा नियोजन भवनात बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महामार्गावरच्या अपूर्ण कामांच्या विषयांसाठी गतकाळात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. त्यानंतर केलेल्या पाहणीत अपूर्ण कामे ‘जैसे थे’च दिसली. समस्या तशात असताना ‘टोल’ आकारणी सुरू केली. ते उचित नाही. म्हणून टोल बंद करू म्हणून भूमिका स्पष्ट केली आहे.
-संजय सावकारे, वस्त्र उद्योगमंत्री.