भाजप बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन- गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 13:43 IST2019-10-13T13:43:17+5:302019-10-13T13:43:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके

Minister Girish Mahajan - Gulabrao Patil standing in on BJP's case against rebels | भाजप बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन- गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी

भाजप बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन- गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी

जळगाव - जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार उभे असल्याने त्यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले. याबाबत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार रिंगणात आहेत. या चारही ठिकाणी भाजपचे चार बंडखोर उभे आहेत. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असे गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले, मात्र तसे करता येणार नाही, असे महाजन यांनी सांगितल्याने दोघांमध्ये सभास्थळीच जोरदार वाद झाला.
जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. या चारही ठिकाणी भाजपचे बंडखोर उभे आहेत. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात स्वत: गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे, चोपड्यातील शिवसेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्याविरुद्ध भाजपाचे जि.प.तील सभापती प्रभाकर सोनवणे, पाचोरा येथे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर अमोल शिंदे हे रिंगणात आहेत. तर पारोळ्यात शिवसेनेचे चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर गोविंद शिरोळे हे रिंगणात आहेत. त्यामुळे या चारही ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उपनेते गुलाबराव पाटील यांनी थेट मोदी यांच्याकडेच व्यथा मांडण्याची परवानगी मागितली. त्यावरुन हा वाद झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भाजपने बंडखोर उमेदवारांवर कारवाई करावी, असे पत्र स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिले आहे. तरीही कारवाई होत नाही. युतीसाठी हे योग्य नाही.

Web Title: Minister Girish Mahajan - Gulabrao Patil standing in on BJP's case against rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव