शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

वाचकांच्या मनावर ‘लोकमत’चेच अधिराज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:49 PM

मान्यवरांचे गौरवोद्गार : ४२ व्या वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव : पाड्यापासून ते जागतिक पातळीपर्यंतची इत्यंभूत माहिती तत्परतेने वाचकांपर्यंत पोहोचविण्यासह सत्य जनतेसमोर मांडण्याचे विश्वासार्ह काम ‘लोकमत’ करीत असल्यानेच व सरकार कोणाचेही येवो, वाचकांच्या मनावर ‘लोकमत’चे अधिराज्य कायम आहे, असे गौरद्गार ‘लोकमत’ जळगाव आवृत्तीच्या ४२व्या वर्धापन दिन सोहळ््यात मान्यवरांनी काढले.महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचा ४२ वा वर्धापन दिन सोहळा रविवार, १५ डिसेंबर रोजी औद्योगिक वसाहतमधील ‘लोकमत’ कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी हा सूर उमटला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी स्वत: उपस्थित राहून तर काहींनी भ्रमणध्वनी, दूरध्वनी व सोशल मीडियाद्वारेही शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा़पी़पी.पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी सहकार राज्यमंत्री आमदार गुलाबराव पाटील, महापौर सीमा भोळे, ‘शाकाहार सदाचार’चे प्रणेते रतनलाल सी.बाफना, आमदार लता सोनवणे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जनता बॅँकेचे अध्यक्ष अनिल राव, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर रमेशदादा जैन, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले उपस्थित होते.गुुलाबी थंडीत सायंकाळी सहा वाजता ‘लोकमत’च्या हिरवळीवर या स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वालन करण्यात आले.‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात झालेले बदल, प्रगती तसेच तंत्रज्ञानामुळे झालेले परिवर्तन याची प्रातिनिधीक स्वरुपात माहिती असलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात ‘लोकमत’च्या ४२ वर्षांच्या प्रवासाची तसेच ‘प्रिंट टू डिजिटल’ अशा प्रगतीची माहिती देण्यात आलीगुलाबी थंडीत रंगला स्नेहसोहळाखान्देशी मातीची, माणसाची शान आणि मान उंचावणाऱ्या ‘लोकमत’ने रविवारी संध्याकाळी शेकडो वाचक आणि हितचिंतकांच्या साक्षीने ४२व्या वर्षात पदार्पण केले. वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत भवनासह परिसरात आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली होती. हितचिंतक आणि वाचकांचे आगमन होत असताना सनईचे मंजुळ स्वर वातावरणात रंगत आणत होते. गुलाबी थंडी, दुधाचा गोडवा आणि वाचकांच्या प्रेमामुळे वातावरण धुंद झाले होते. रोशणाईचा लखलखाट व गुलाबी थंडी अशा आल्हाददायक वातावरणात शुभेच्छांचा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. या वेळी आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, संजय सावकारे, अनिल भाईदास पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, माजी आमदार हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवानी, संतोष चौधरी, सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, माजी महापौर नितीन लढ्ढा, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार, इकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. सुशील अत्रे, सी.ए. अनिल शहा, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी, सहायक सरकारी वकील मोहन देशपांडे, अ‍ॅड.सुरेंद्र काबरा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ‘लोकमत’चे उपसंपादक विलास बारी यांनी केले.‘लोकमत’शी जवळचे नाते-गुलाबराव पाटीलवृत्तपत्र व लोकप्रतिनिधी यांचे जवळचे नाते आहे. त्यात ‘लोकमत’शी तर अगदी घट्ट नाते आहे. कारण आमचे काही चुकले तर त्याविषयी ‘लोकमत’ बातमीच्या स्वरुपातून जशी जाणीव करून देते तसे चांगल्या कामाबद्दल कौतुकाची थापही देते, असा उल्लेख गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात आवर्जून केला.‘लोकमत’च्या बातम्यांमुळेच मला १९९९ मध्ये सर्वप्रथम उमेदवारी मिळण्यास मदत झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.पाया ढासळू न देता ‘लोकमत’ची उत्तरोत्तर प्रगती - डॉ. उल्हास पाटील‘लोकमत’ची सुरुवात व ४२ वर्षांचा प्रवास पाहता सुुरुवातीपासूनच त्याच्या प्रगतीत सातत्य आहे. ‘लोकमत’च्या विश्वासार्हतेमुळे दररोज वाचक ‘लोकमत’ची प्रतीक्षा करीत असतात. एवढी प्रगती केली तरी ‘लोकमत’ने ज्या पायावर ही झेप घेतली आहे, तो पाया ढासळू दिलेला नसल्याचे गौरोद्वगार डॉ. उल्हास पाटील यांनी काढले.सत्यतेच्या बळावरच ‘लोकमत’ लोकप्रिय - अरुणभाई गुजराथीसमाजकारण असो की राजकारण सर्व घटकांना न्याय देण्याचे काम ‘लोकमत’ करीत असून सत्यतेच्या बळावरच ‘लोकमत’ लोकप्रिय असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी नमूद केले. वृत्तपत्रातील संपादकीय महत्त्वाचे असून ‘लोकमत’चे संपादकीय पान तसेच लेखन, बातमीची शैली उत्तम असल्यानेच ‘लोकमत’ची वाचकसंख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव