अज्ञात वाहनाच्या धडकेत दूधविक्रेता ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 17:43 IST2021-02-28T17:42:50+5:302021-02-28T17:43:40+5:30
दूध विक्रेत्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक मारल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली

अज्ञात वाहनाच्या धडकेत दूधविक्रेता ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : अज्ञात वाहनाने दूध विक्रेत्या तरुणाला धडक मारल्याने जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी रात्री साडेआठ वाजता ताडेपुरा रस्त्यावर घडली.
खेडी खुर्द प्र अमळनेर येथील राहुल भालेराव पाटील (२६) हा २६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातून सायकलवरून दूध वाटप करून घरी परतत असताना ताडेपुरा भागात आबासो एस. एस. पाटील आश्रमशाळेजवळ त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. तो सायकलसह खाली पडल्याने त्याला छातीत व पोटात मार लागला होता. धडक देणारा वाहन चालक फरार झाला होता. राहुल याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
शरद मधुकर पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यानंतर अज्ञात वाहन चालकविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल भरत ईशी करीत आहेत.